द्राक्षाची सुगी आली अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:48+5:302021-04-04T04:22:48+5:30
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाठोपाठ करकंब, भोसे परिसरात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. कमी पाण्यावर हमखास येणारे पीक म्हणून द्राक्ष बागांकडे ...
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाठोपाठ करकंब, भोसे परिसरात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. कमी पाण्यावर हमखास येणारे पीक म्हणून द्राक्ष बागांकडे पाहिले जाते. मागील वर्षी द्राक्ष व बेदाण्याचे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळाले. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे द्राक्षाला कवडीमोल भावाने मागणी होऊ लागली. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला त्यामुळे बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
असे असले तरी उच्च प्रतीच्या बेदाण्याला २५० रुपये प्रति किलोच्या आसपास भाव मिळाला होता. चालू हंगामात या परिसरातील ४० टक्के बागांना पीक आलेच नाही. पिकलेल्या बागांमध्ये द्राक्ष उत्पादनात सरासरीपेक्षा घट झाल्याचे महादेव व्यवहारे, पोपट धायगुडे, बंडू वंजारी आणि देवीदास जमदाडे या शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्पादनात निम्म्याने घट
यावर्षी बेदाण्याला किमान २०० ते ३०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला तरच उत्पादनात झालेली घट भरून निघणार असल्याचे करकंब येथील द्राक्ष उत्पादक महादेव व्यवहारे यांनी सांगितले.
माझी १५ एकर द्राक्ष बाग आहे. मागील वर्षी माझा ५० टन बेदाणा झाला होता. परंतु यावर्षी माझा २५ टन बेदाणा झाल्यामुळे उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.
कोट :::::::::::::::::::::::::::
द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बेदाण्याला जो भाव मिळाला होता तोच भाव उत्पादनात घट झाली असतानाही मिळत आहे. वाढीव भाव मिळाला तरच किमान उत्पादनात वाढलेल्या खर्चाची बरोबरी होणार आहे.
- देवीदास जमदाडे
द्राक्ष उत्पादक, भोसे
कोट :::::::::::::::::::::
माझ्या ३ एकर द्राक्ष बागेला मालच लागला नाही. २ एकर मधील बेदाण्याला २१५ ते २२५ रुपये प्रति किलोला भाव मिळाला आहे.
- बंडू वंजारी
द्राक्ष उत्पादक,
करकंब
फोटो ::::::::::::::::::::::::::::
करकंब येथील महादेव व्यवहारे यांच्या बेदाणा शेडवरील बेदाणा काढताना मजूर.