सोलापूरात ग्रीन कॅरिडोर मोहिम यशस्वी, ४ अवयव पुण्याला पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:48 PM2018-07-23T14:48:41+5:302018-07-23T14:51:37+5:30
अवयवदानाची चळवळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे़
सोलापूर : अवयवदानाची चळवळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ सोलापूरात या चळवळीला वेग आला असून सोमवार २२ जुलै रोजी आषाढी एकादशीदिवशी सोलापूरातील यशोधरा हॉस्पीटल येथे राबविण्यात आलेली ग्रीन कॅरिडोअर मोहिम यशस्वी पार पडली़ या मोहिमेत 4 अवयव पुण्याला पाठविण्यात आले़ यात १ हदय, २ किडनी, २ डोळे, १ स्वादूपिंड, १ यकृत या अवयवांचा समावेश आहे़
दरम्यान, रविंद्र श्रीरंग शिंगाडे (वय ३१ रा़ हिवरे, ता़ मोहोळ) येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सोमवार २२ जुलै रोजी यशोधरा हॉस्पीटल, सोलापूर येथे ग्रीन कॅरिडोरची मोहिम राबविण्यात आली होती़ दुपारी दोनच्या सुमारास विशेष विमानाने अवयव पुण्याला हलविण्यात आले़
यातील हदय हे रूबी हॉस्पीटल, पुणे, किडणी व स्वादूपिंड हे दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल, पुणे, यकृत हे अदित्य बिरला गु्रप हॉस्पीटल, पुणे, २ डोळे हे सोलापूरातील शासकीय रूग्णालयात तर १ किडनी येथीलच यशोधरा हॉस्पीटल, सोलापूर येथे पाठविण्यात आले़