सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात ग्रीन कॅरिडॉर मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:29 PM2018-08-22T13:29:06+5:302018-08-22T13:34:31+5:30

बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबियांनी केले अवयव दान

Green Caridor campaign in Ashwini Hospital, Solapur | सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात ग्रीन कॅरिडॉर मोहिम

सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात ग्रीन कॅरिडॉर मोहिम

Next
ठळक मुद्देएक किडनी सोलापूरच्याच अश्विनी रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपण करण्यात येणारमेंदू मृत रुग्ण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील रहिवासीएक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला रवाना होणार

 सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या अश्विनी रूग्णालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील व्यक्तीने आपले अवयवदान केले़ त्या व्यक्तीने दिलेले एक किडनी, स्वादुपिंड, डोळे हे अवयव पुण्याच्या सहयाद्री हॉस्पीटलला रवाना होणार आहे़ यासाठी ग्रीन कॅरिडोअर मोहिम राबविण्यात येणार आहे़ 

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक युनुस सत्तार शेख असे ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे नाव आह़े़ १९ आॅगस्ट रोजी सोलापूर तुळजापूर रोडवर शिरवळ येथे दुचाकी आणि कारच्या धडकेत मेंदू मृत रुग्ण युनुस याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती़ त्याच्यावर तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरात आणण्यात आले होते़.

मंगळवारी रात्री उशिरा त्याची तपासणी केली असता ते मेंदूमृत झाल्याची घोषणा अश्विनी रुग्णालयाच्या प्रशासनाने केली होती़ त्यानंतर त्यांच्या नातलगाचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार मेंदू मृत रुग्ण यूनुसची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे या अवयवाचे दान करण्यात दान करण्यास मान्यता मिळाली, त्यानुसार एक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला रवाना होणार आहे.

 याशिवाय ससून रुग्णालयास लिव्हर, शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दोन डोळे आणि एक किडनी सोलापूरच्याच अश्विनी रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपण करण्यात येणार आह़े़ मेंदू मृत रुग्ण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील रहिवासी आहे़ त्यांच्या पश्चात तीन मुले पत्नी भाऊ आई असा परिवार आहे

Web Title: Green Caridor campaign in Ashwini Hospital, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.