पोलीसदादांच्या वसाहतीला ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:10+5:302021-06-10T04:16:10+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली पोलीस चाळ व नंतर १९८१ साली बांधण्यात आलेली नवी चार मजली इमारत ही आता राहण्यास धोकादायक ...
स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली पोलीस चाळ व नंतर १९८१ साली बांधण्यात आलेली नवी चार मजली इमारत ही आता राहण्यास धोकादायक असल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मोहोळ पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन इमारत व्हावी यासाठी मागणी केली जात होती. नवीन पोलीस वसाहत व्हावी यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू होते.
अखेर जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या योजनेंतर्गत पोलीस व तुरुंग या विभागाच्या आस्थापनेमधील पायाभूत सुविधा पुरविणे व इतर उपयुक्त तंत्रज्ञान पुरविणे यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ४ कोटी ८२ लाख रुपयांची मान्यता मोहोळसाठी देण्यात आल्याचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे जिल्हाधिकारी तथा सचिव संजीव जाधव यांनी मोहोळ पोलीस ठाण्याला दिले आहे. पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीसह कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार यशवंत माने यांनी या इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले.
----
पोलिसांना नवी वसाहत
स्वातंत्र्यपूर्व काळात मोहोळ येथे पोलिसांना राहण्यासाठी मोठी चाळ बांधण्यात आली होती. पूर्वी मोहोळ आऊट पोस्ट होते. मोहोळचा कारभार माढा पोलीस चौकीतून चालत असायचा. मोहोळ गावासाठी त्या काळात जेमतेम ७ ते ८ पोलिसांची नेमणूक केली होती. आता ती चाळ कात टाकत असून, त्या जागेत नवीन इमारत होणार आहे.
----
फोटो : ०८ मोहोळ पोलीस १
-स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली पोलीस चाळ.
---
फोटो : ०८ मोहोळ पोलीस २ - १९८१ मधे बांधलेली इमारत.