बार्शीत नियमांचे पालन करत बाबासाहेबांना आभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:50+5:302021-04-16T04:21:50+5:30
या वेळी शहरातील सर्वांत मोठ्या भीमनगर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमित कदम, उपाध्यक्ष तथागत मस्के, खजिनदार बुद्धभूषण अय्यर ...
या वेळी शहरातील सर्वांत मोठ्या भीमनगर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमित कदम, उपाध्यक्ष तथागत मस्के, खजिनदार बुद्धभूषण अय्यर तर सचिव प्रेम कांबळे उपस्थित होते. या वेळी त्यांनी मिरवणूक आणि रॅली न काढता भीमनगर चौक येथे मंडप टाकून फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या मूर्ती ठेवून डेकोरेशन केले होते.
सिद्धार्थ नगर येथेही मंडप टाकून आकर्षक रोशणाईबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान अभिवादनासाठी ठेवण्यात आली होती.
मंडळाचे अध्यक्ष आकाश गायकवाड, उपाध्यक्ष मनोज ओहोळ, खजिनदार सुमित काकडे, सचिव समाधान शिंदे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. या वेळी शहरातील विविध राजकीय, सामाजिक कार्यात असणाऱ्या पुढारी तसेच अधिकाऱ्यांनी भेटी देऊन अभिवादन केले. भीमनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी आले होते.
या वेळी वीरेंद्र कांबळे, स्वामिनी संस्थेचे विक्रांत पवार, भीमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे, दयावान कदम, राहुल बोकेफोडे, आबा बोकेफोडे, रिपाइंचे अविनाश गायकवाड, सनी गायकवाड, बसपाचे प्रसन्नजीत नाईकनवरे, नगरसेवक आण्णा लोंढे, रोहित लोंढे, विनोद लंकेश्वर, रूपेश बंगाळे, विजय विद्यागज आदी उपस्थित होते.
१५बार्शी-आंबेडकर जयंती
----