सामूहिक राजीनामे
By admin | Published: May 24, 2014 01:15 AM2014-05-24T01:15:39+5:302014-05-24T01:15:39+5:30
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले आहेत.
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेस कमिटीतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले आहेत. या राजीनाम्याच्या घडामोडींमुळे पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. शिंदे यांच्या पराभवाची आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारत आहोत आणि पक्ष संघटनेतील पदाचे सामूहिक राजीनामे आपणास सादर करीत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे शहर सरचिटणीस राजन कामत, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, सरचिटणीस मनीषा गडदे, सचिव अरूण साठे, सचिव राजकुमार आयगोळे, उपाध्यक्ष शरणप्पा दुर्लेकर, अरविंद भांडेकर, शिवाजी कदम, लक्ष्मण गडगी, बजरंग जाधव, अनिल मस्के, गौतम मसलखांब, अशोक चव्हाण, रेवणसिद्ध बिज्जरगी, अॅड. करिमुन्नीसा बागवान, फारूख हुसेन कमिशनर, जहीर सगरी, विजय साळुंके, अजय दासरी, अनिल पल्ली, हेमा चिंचोळकर, पुरूषोत्तम बलदवा, आझम शेख, रफिकभाई बागवान, अविनाश जाधव यांच्या सह्या आहेत.