द्राक्ष उत्पादनातील अडथळ्यांवर उत्पादकांनी जाणून घेतले उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:06+5:302021-09-16T04:28:06+5:30
माढा : रोटरी क्लबच्यावतीने शेती व्यावसायिकांना चालना देण्यासाठी माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या ...
माढा : रोटरी क्लबच्यावतीने शेती व्यावसायिकांना चालना देण्यासाठी माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत द्राक्ष उत्पादनातील अडथळ्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करीत उपाययोजना सांगितल्या.
यावेळी अध्यक्ष सचिन घाडगे, सचिव औदुंबर पवार, डाळिंब तज्ज्ञ प्रा. प्रशांत कुंभार, रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, नागनाथ घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, विक्रमी द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी पोषक वातावरण असलेला हा जिल्हा आहे. तरुण शेतकऱ्यांचा द्राक्ष बागेकडे वाढता कल पाहता योग्य नियोजन, अभ्यास, कुशल शेतमजूर मिळाले पाहिजेत. तसे झाल्यास उत्पादनात नाशिकला मागे टाकू.
यावेळी मार्गदर्शक अश्विन दळवी यांनी रोग नियंत्रणासाठी बदलत्या निसर्गाच्या सूचना करून देणारे मशीन द्राक्ष उत्पादकांसाठी गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी भारत लटके, अशोक लोंढे, प्रवीण भांगे, रमेश कदम, किरण चव्हाण, अजिंक्य चव्हाण, गोपीनाथ गवळी, संभाजी चव्हाण, वैभव काशीद, रामभाऊ भांगे, सुहास पाटील, संदीप कापसे उपस्थित होते.
--------
फोटाे :
130921\575230061658-img-20210913-wa0023.jpg
रोटरी क्लब ऑफ माढा च्या वतीने द्राक्षे उत्पादकांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.