टिपरच्या धडकेत जीएसटी कार्यालयातील कर्मचाºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:42 AM2020-02-11T11:42:49+5:302020-02-11T11:46:22+5:30

होटगी रोडवरील घटना; अपघातानंतर होटगी रोडवरील वाहतुक विस्कळीत

GST office worker dies in Tipper collision | टिपरच्या धडकेत जीएसटी कार्यालयातील कर्मचाºयाचा मृत्यू

टिपरच्या धडकेत जीएसटी कार्यालयातील कर्मचाºयाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे- आसरा चौकातील अपघाताचे सत्र सुरूच- वाहतुक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले- अपघातानंतर वाहतुक कोंडी कायमच

सोलापूर : होटगी रोडवर भरधाव वेगात निघालेल्या टिपरने दुचाकीला जोराची धडक दिली़ या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना होटगी रोडवरील गैबीपीर दर्गाह परिसरात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. 

आय. जे. कांबळे (रा. पंकज सोसायटी, अंत्रोळीकर नगर परिसर, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांबळे हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या जीएसटी कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कांबळे हे याच कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टपाल वाटपाचे काम करत होते अशी माहिती पोलीसांनी दिली़ मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास होटगी रोडवरुन घराच्या दिशेने जाताना भरधाव टिपरने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.



 

Web Title: GST office worker dies in Tipper collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.