तऱ़़...साखरेच्या दरालाही हमी भाव द्या, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मांडली भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:13 AM2017-11-03T11:13:57+5:302017-11-03T11:17:24+5:30
शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत, शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत, शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.
सध्या उसाची पहिली उचल किती देणार?, हा प्रश्न उपस्थित करुन शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे. साखर कारखानदारांनी शेतकºयांचा चार पैसे फायदा होईस असा उसाला दर देण्यासाठी साखरेचा दरही निश्चित असला पाहिजे असे साखर कारखानदारांचे मत आहे. मागील वर्षी साखरेचा जो दर होता तो याहीवर्षी मिळेल असे सांगता येत नाही. यावर्षी साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या दीड पट होईल, त्यामुळे साखरेचा दर कमी होणार नाही, याची खात्री कोण देणार? असे कारखानदारांचे म्हणणे आहे. आम्ही एफ.आर.पी. तर देणारच आहोत, त्यासाठी बांधील असल्याचे लोकनेते शुगरचे संस्थापक माजी आ. राजन पाटील, सिद्धनाथचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने व युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले.
-------------------
संघटनांनी शासनाशी भांडावे
जसे ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कारखान्याच्या यंत्रणेशी भांडतात तसे साखर दरासाठी शासनाशीही भांडावे तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अधिक दर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकºयांची असणे चुकीचे नाही परंतु दरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली.
--------------------
कर्नाटक सरकारचे अनुकरण करावे
मागील वर्षी ऊस दर कमी झाला त्यावेळी कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने प्रतिटन २०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले होते. अशाच पद्धतीने महाराष्टÑ शासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी. आ. राजन पाटील व दिलीप माने यांनी केली.
-------------------
साखर उताराच कमी दाखवून काही कारखानदार शेतकºयांची लूट करीत आहेत. याशिवाय वजनकाटेही संशयास्पद आहेत. उत्पादीत साखरेला खाण्यासाठी व उद्योगासाठीचे दर वेगवेगळे ठेवले तर शेतकºयांना अधिक दर देता येईल.
- प्रभाकर देशमुख,
जनहित शेतकरी संघटना