पालकमंत्र्यांना पालकत्वाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:08+5:302021-04-25T04:22:08+5:30

- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर निर्णय दुर्दैवी पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नेहमीच उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ...

Guardian ministers forget about guardianship | पालकमंत्र्यांना पालकत्वाचा विसर

पालकमंत्र्यांना पालकत्वाचा विसर

Next

-

सुभाष देशमुख,

आमदार, दक्षिण सोलापूर

निर्णय दुर्दैवी

पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नेहमीच उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला आता कुठे उजनीचे पाणी मिळण्याची आशा वाटत होती. सीना नदीला अजूनही पाणी सोडले जात नाही. आम्ही त्यासाठी अधिकाऱ्यांशी सातत्याने संघर्ष करीत आहोत. पालकमंत्र्यांनी आमचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आमच्या भावना तीव्र आहेत. योग्य मार्गाने आम्ही या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू.

- बाळासाहेब शेळके,

माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

पक्षाकडे आमची भूमिका मांडू

दक्षिण सोलापूर तालुक्याला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळते. पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मूक संमती असावी. त्यांनी या प्रश्नावर आपली स्पष्ट भूमिका घ्यावी. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करू. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आमच्या व्यथा मांडू. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला शेतकऱ्यांमधून वाचा फोडण्याचा प्रयत्न करावा लागेल.

- सुरेश हसापुरे,

जिल्हा कार्याध्यक्ष, काँग्रेस कमिटी

असं किती दिवस चालणार?

दक्षिण सोलापूर तालुक्यावर सतत सरकारची अवकृपा असते. जिल्हा उजनीच्या पाण्याने हिरवा गार झाला असताना आमचा तालुका आजही पाण्यासाठी आसुसलेले आहे. आता सरकारनेच असा निर्णय घेतला तर आम्ही दाद कुणाकडे मागायची. पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही, परंतु आमच्या तालुक्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरेल. त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे.

- राजशेखर शिवदारे,

अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ सूत मिल वळसंग

Web Title: Guardian ministers forget about guardianship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.