गुगलकडून सोलापूरातील १३ विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:52 AM2018-06-23T11:52:47+5:302018-06-23T11:54:54+5:30
सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गुगल आणि उडसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातील १३ यशस्वी विद्यार्थ्यांना तीन लाख ७४ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी डब्ल्यू.आय.टी.च्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील आहेत. अँड्रॉईड अँड वेब डेव्हलपमेंट स्पर्धेतील शिष्यवृत्तीपात्रांमध्ये अँड्रॉईड बिगीनर गटात निमा पटेल, आकांक्षा तापडिया, अंकिता गांधी, चयन बोबरा, योगेश कल्याणशेट्टी, महेंद्र महाजन, आसिफ खान हे तृतीय वर्षातील विद्यार्थी आणि अंतिम वर्षाला असलेला रिदम जैन यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी २२ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
वेब बिगीनर गटात प्रखर जैन (तृतीय वर्ष), संजय हिरेमठ आणि प्रज्ञा दुडम (अंतिम वर्ष) यांना प्रत्येकी २७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. अँड्रॉईड एन्टरमिडिएट गटात श्रुती अनोदे, नवकार जैन, प्रखर मेहता जैन (अंतिम वर्ष) यांना प्रत्येकी ३७ हजार ६०० रुपयांची ष्यिवृत्ती मिळाली आहे. तृतीय आणि अंतिम वर्षाला शिकणाºया विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याला अनुसरून गुगलने घेतलेली ही परीक्षा होती.
प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस्ट्री रेडी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या हेतूने या महाविद्यालयात सातत्याने नवनवे उपक्रम राबविण्यात येतात. जागतिक मानांकनप्राप्त केलेल्या बहुराष्टÑीय कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळते, त्यादृष्टीने आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेते, असे मत डॉ. हलकुडे यांनी व्यक्त केले़