गुरूजींनी कोरोना निर्मुलनासाठी दिला ७ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:58+5:302021-05-29T04:17:58+5:30
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ७ लाख रुपयांचा मदत निधी दिला. या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून ...
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ७ लाख रुपयांचा मदत निधी दिला. या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून आरोग्य विभागाला द्यावेत, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यानुसार आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीसाठी गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे ७ लाख रुपयांचा मदतनिधी सुपूर्द केला. यावेळी उपसभापती प्रताप पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती किशोर सूळ, झेडपी सदस्या सुनंदा फुले, अरुण तोडकर, किरण वाघमोडे, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, अनिल जाधव, ओंकार माने-देशमुख, विकास कोळेकर, गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते, आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे आदी उपस्थित होते.