शिक्षणाची धुरा सांभाळणारे गुरुजी करताहेत कोराेनाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:21+5:302021-04-12T04:20:21+5:30
गर्दीची ठिकाणे हेरून त्या ठिकाणी या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र काही शाळा व शिक्षक यासाठी प्राधान्यक्रम देत ...
गर्दीची ठिकाणे हेरून त्या ठिकाणी या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र काही शाळा व शिक्षक यासाठी प्राधान्यक्रम देत आहेत. यासाठी गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते यांच्या परिश्रमातून शिक्षक उपक्रम राबविताना दिसत आहेत.
गुरुजी लागले कामाला
‘कौन बनेगा कोरोना फायटर’ हा चालता-बोलता प्रश्नमंजूषा, नागरिकांना गांधींच्या वेशातून गांधीगिरी, विनामास्क फिरणाऱ्यांना मास्क व गुलाबपुष्प, कोविड लसीविषयी असणारे गैरसमज दूर करणारे कार्यक्रम, महिला शिक्षकांनी उखाणे, पोस्टर स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, लस घेणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, प्रबोधन फेरी, मी जबाबदार अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोरोना जागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जात आहेत.
फोटो : ‘मी जबाबदार’ या पथनाट्यातून प्रबोधन करताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक.