सात लाखांच्या टेम्पोसह २८ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:07+5:302021-07-02T04:16:07+5:30

खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी मार्केट यार्ड परिसराच्या आजूबाजूला शोध घेतला. तेथे छोटा टेम्पो (नं. एमएच १३/डीक्यू ...

Gutka worth Rs 28 lakh seized with Rs 7 lakh tempo | सात लाखांच्या टेम्पोसह २८ लाखांचा गुटखा जप्त

सात लाखांच्या टेम्पोसह २८ लाखांचा गुटखा जप्त

Next

खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी मार्केट यार्ड परिसराच्या आजूबाजूला शोध घेतला. तेथे छोटा टेम्पो (नं. एमएच १३/डीक्यू ०६९०) आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा मिळून आला. सदर गाडी ज्या घरासमोर उभी होती, त्या घराची झडती घेतली असता त्या घरातील दोन खोल्यांमध्येही अवैध गुटखा आढळून आला.

घरातील व टेम्पोतील विमल पान मसाला ५ हजार ८०० पॅकेट (६ लाख ९६ हजार), व्ही. १ तंबाखू ५ हजार ८०० पॅकेट (१ लाख ५० हजार), सुपर जॅम पान मसाला २ हजार पाकिटे (२ लाख ४० हजार), एस ९९ तंबाखू (६० हजार), आरएमडी पान मसाला (१० लाख ८ हजार), एम सेंटेड तंबाखू (६ लाख ३६ हजार), आराधना सुगंधी तंबाखू (३० हजार) आणि छोटा टेम्पो ७ लाख रुपये असा ३५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्विनीया प्रकरणी गणेश विलास पंडित (वय ३४, रा. रांझणी, ता. पंढरपूर) व श्रीशैल कलमानी उर्फ अप्पू (रा. चडचन, कर्नाटक) यांच्या विरुध्द गुन्हा नोंदल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले. सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र मगदूम, पोहेकॉ कदम, गोसावी, बिपीनचंद्र ढेरे, पोकॉ संजय गुटाळ, सुनील बनसोडे, सुजीत जाधव, समाधान माने, विनोद पाटील यांनी केली. तपास सपोनि राजेंद्र मगदूम करीत आहेत.

----

घरामध्येही आढळा गुटखा

वाहन व घरामध्ये असलेल्या गुटख्याच्या मालकाची चौकशी केली असता हा अवैध गुटखा रांझणी (ता. पंढरपूर) येथील एका संशयित इसमाचा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या इसमाचा शोध घेऊन चौकशी केली असता हा गुटखा त्याचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर यांना घटनास्थळी बोलावून सदर गुटख्याची पाहणी केली. अन्न पदार्थ प्रतिबंधात्मक सॅम्पल घेऊन सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन त्या संशयित इसमाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

-----

Web Title: Gutka worth Rs 28 lakh seized with Rs 7 lakh tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.