सोमवारी रात्री पकडला लाखोंचा गुटखा, दुस-या दिवसी दाखल झाला गुन्हा
By काशिनाथ वाघमारे | Published: July 25, 2023 09:02 PM2023-07-25T21:02:27+5:302023-07-25T21:02:34+5:30
कारीत कारवाई : साडेपाच लाखांच्या मसाल्यासह वाहन पकडले
सोलापूर : पांगरी पोलीस स्टेशन हद्दीत कारी येथे गुटखा आणि सुगंधीत मसाल्याने भरलेले वाहन एका पत्र्याच्या शेडजवळ थांबलेल्या अवस्थेत पोलिसांनी पकडले. सोमवार, २४ जुलै रात्री ८.३० वाजेदरम्यान झालेल्या कारवाईबाबत दुस-या दिवसी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू राहिली.
या कारवाईत ५ लाख ५६ हजारांचा गुटखा, सुगंधीत मसाला असा प्रतिबंधीत अन्नसाठा पोलिसांनी पकडला आणि तो पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार गुटख्यांनी भरलेला एक टेम्पो कारी येथे गणेश विधाते यांच्या पत्रा शेडच्या गोडाऊन जवळ उभा होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथे धाव घेतली. या कारवाईत ४ लाख ६० हजारांचा १२ पोती सुंगधीत मसाला, ९६ हजारांचा दहा पाेती जाफराणी जर्दा असा एकूण पाच लाख ५६ हजाराचा प्रतिबंधीत अन्नसाठा टेम्पोसह पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईनंतर पोलिसांनी सोलापूरमधील अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती दिली. मात्र मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि रात्रीत गुन्हा दाखल झाला.पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस नायक संदेश पवार, पोलीस काँन्स्टेबल बाळकृष्ण मुठाळ यांनी सहभाग नोंदवला.
मंगळवारी सायंकाळी पांगरी पोलिसात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आणि गणेश विधाते रा.कारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत .