हगलूरच्या डान्सबार, आर्केस्ट्राबारवर पोलीसांची धाड; ६ महिलांसह २८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2022 06:37 PM2022-07-24T18:37:40+5:302022-07-24T18:37:46+5:30

विदेशी दारू, डी.जे. मुझिकल साउन्ड सिस्टीमसह एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रूपये किंमतीचे साहित्य जप्त

Hagalur's dance bar, orchestra bar raid by police; Action against 28 people including 6 women | हगलूरच्या डान्सबार, आर्केस्ट्राबारवर पोलीसांची धाड; ६ महिलांसह २८ जणांवर कारवाई

हगलूरच्या डान्सबार, आर्केस्ट्राबारवर पोलीसांची धाड; ६ महिलांसह २८ जणांवर कारवाई

googlenewsNext

सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्हयातील अवैधरित्या चालणा-या धंदयावर कडक मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांना माहिती काढून अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

स.पो.नि. नागनाथ खुणे व त्यांचे पथक अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी तुळजापूर रोडवरील मश्रुम गणपतीजवळ हजर असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की,  मौजे हगलूर ता. उत्तर सोलापूर गावच्या शिवारात हगलूर ते दहिटणे जाणारे रोड लगत असलेल्या एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट अन्ड बार’’ च्या आवारातील हाॅलमध्ये बेकायदा बिनापरवाना बारमध्ये काही महिला अंगावर तोडके कपडे घालून विभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्यावरून
 स.पो.नि. नागनाथ खुणे यांनी तात्काळ सदरबाबत वरिश्ठांना कळवून सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील स.पो.नि. नागनाथ खुणे व सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पो.स.ई. शिवकुमार जाधव व त्यांचे पथक असे ‘‘एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट अॅन्ड बार’’ च्या आत जावून पाहिले असता, तेथील स्टेजवर  ६ महिला अंगावर तोडके कपडे घालून विभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या, समोरील  बाजूस सोफयावर काही प्रेक्षक ग्राहक म्हणून बसलेले दिसून आलेे. तेंव्हा त्यातील काही प्रेक्षक स्टेजकडील नर्तकीकडे पाहून अश्लील हावभाव करून संगिताच्या तालावर नाचत असताना मिळून आले. तेथे उपस्थित असलेल्या बार मॅनेजरकडे आॅर्केस्ट्राबार परवाना बाबत विचारपूस केले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदर बारमधून *डी.जे. म्युझिकल साउन्ड सिसस्टिम, दोन कुलर, एक लॅपटाॅप, लाईट सिस्टिम, विदेशी दारूचे क्वार्टर व बिअरचा साठा, तसेच १५ मोटार सायकली असा एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रू. किंमतीचे साहित्य जप्त करून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरंन 555/2022 भादविसंक 294, 34 प्रमाणे व महाराश्ट्र राज्य दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस  निरीक्षक  नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, पो.स.ई. शिवकुमार जाधव पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, चालक समीर शेख, प्रमोद माने, महिला अनिसा पटेल, सुनंदा झळके,  सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे हवेल जाधव, शिवाजी मोरे यांनी बजावली आहे.

 

Web Title: Hagalur's dance bar, orchestra bar raid by police; Action against 28 people including 6 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.