अक्कलकोट तालुक्यात गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:03+5:302021-04-30T04:28:03+5:30
गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून तालुक्याच्या पूर्वेस आकाशात काळे निळे ढग जमले. काही वेळाने पश्चिमेला सरकत जात सलगर, निंगदळळी, भोसगे, ...
गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून तालुक्याच्या पूर्वेस आकाशात काळे निळे ढग जमले. काही वेळाने पश्चिमेला सरकत जात सलगर, निंगदळळी, भोसगे, तोरणी, संगोगी (आ) या भागात गारपीट झाली. तसेच वागदरी, शिरवळ, सदलापूर, चिक्केहळळी, तोळणूर, नागणसूर, डिग्गेवाडी, जेऊर, हैद्रा, गौडगाव, कडबगाव, शावळ, अक्कलकोट स्टेशन अशा विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तासभर झाला.
या पावसाने तालुक्यातील झाडावर असलेले आंबे, केळी, द्राक्ष, या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा, गव्हाच्या राशी राहिल्याने नुकसान झाले. तसेच लाखो रुपये किमतीचा शेतात जमिनीवर पडून असलेला कडबा भिजला.
सलगर भागात गारपीट
सलगर भागात गारपीट झाली, तर अक्कलकोट स्टेशन भागात रस्त्यावरून पाणी वाहिले. यामुळे आंबा, द्राक्ष, केळी या फळांसह शेकडो एकर शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
फोटोओळ
सलगर (ता. अक्कलकोट) शिवारात गारांचा अवकाळी पाऊस तर अक्कलकोट स्टेशन भागात सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी झाले.