गारपीटचे ७१ कोटी मिळाले
By admin | Published: May 20, 2014 01:04 AM2014-05-20T01:04:38+5:302014-05-20T01:04:38+5:30
तिसरा टप्पा : दोन दिवसांत तहसीलदारांकडे वर्ग करणार
सोलापूर: फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीची तिसर्या टप्प्याची रक्कम शासनाने दिली असून, पुणे विभागाला १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये मिळाले आहेत. गारपीटग्रस्त पीक नुकसानीपोटी शेतकर्यांना वाटपासाठी यापूर्वी ३०५ कोटी रुपये देण्यात आले होते. यापैकी पुणे जिल्ह्याला ५३ कोटी ४२ लाख, सातारा जिल्ह्याला ५४ लाख २५ हजार, सांगली जिल्ह्याला १६ कोटी ४३ लाख तर सोलापूर जिल्ह्याला २३४ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये मिळाले आहेत. तिसर्या टप्प्यात पुणे विभागाला १५० कोटी रुपये आले आहेत. सोलापूर जिल्ह्याला आलेली ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम मागणीप्रमाणे तालुक्यांना दिली जाणार आहे. माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यांना यापूर्वीच मागणीप्रमाणे निधी मिळाल्याने यातील रक्कम अन्य तालुक्यांना दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
---------------------
१५० कोटींचे वितरण
पुणे विभागाला तिसर्या टप्प्यासाठी आलेली १५० कोटींची रक्कम तीन जिल्ह्यांना वितरित केली आहे. सातारा जिल्ह्याची मागणीच नाही तर कोल्हापूरला गारपीट झाली नव्हती. पुणे- ७० कोटी १४ लाख २५ हजार, सांगली- ४ कोटी ६६ लाख ४९ हजार, सोलापूर- ७० कोटी ६६ लाख ५४ हजार.
---------------------
वाटप पूर्ण झाल्यावर निधीची मागणी ४काही गावांतून गारपीट पंचनामे होऊनही मदतीच्या यादीत नावे नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची तपासणी करून अहवालाची मागणी केली आहे. आता आलेली रक्कम वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर दिलेली रक्कम, वाटप झालेली रक्कम व शिल्लक रक्कम याचा आढावा घेण्यात येईल. तहसीलदारांकडून आढावा घेतल्यानंतर नुकसानग्रस्तांसाठीच्या निधीची मागणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
--------------------------------
पंचनाम्यानुसार केलेल्या मागणीप्रमाणे यापूर्वी मिळालेले २३४ कोटी ६० लाख रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. मागणीप्रमाणे उर्वरित मिळालेली ७१ कोटींची रक्कम दोन-तीन दिवसात बँकांकडे दिली जाईल. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी