एकाच रात्री अर्धा डझन चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:01 AM2021-02-20T05:01:31+5:302021-02-20T05:01:31+5:30
यातील फिर्यादी अशोक लाड (रा. सिध्दापूर) यांच्या साई किराणा स्टोअर्सचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेले ...
यातील फिर्यादी अशोक लाड (रा. सिध्दापूर) यांच्या साई किराणा स्टोअर्सचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेले ७३ हजार ३०० रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सचिन वाघमोडे यांच्या अंबिका मेडिकल, प्रकाश कोळी यांचे रेणुका किराणा स्टोअर्स यांचेही बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेली आहे. याच गावातील महमद चाँद शेख, दावल तांबोळी यांच्याही दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली. या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, शिवगोंडा तळ्ळे यांच्या घरासमोर लावलेली ४० हजार रुपये किमतीची (एमएच १३/डीएफ ३५६६) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या चोरीचा तपास पोलीस नाईक संतोष चव्हाण करीत आहेत. सध्या सुगी सराईचे दिवस चालू असल्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. एकाच दिवशी सिध्दापूरमध्ये अर्धा डझन चोऱ्या झाल्यामुळे व्यापारी व नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांना आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांमधील मुद्देमाल हस्तगत करणे व चोरांना पकडणे यात यश न आल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा होत आहे. मंगळवेढा शहरात ३५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. ही चोरी केवळ सोलापूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघड करून आरोपीस जेरबंद केले. स्थानिक पोलिसांना मात्र आतापर्यंत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यास सध्यातरी यश आले नाही. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीच येथील स्थानिक पोलिसांना आपल्या कर्तव्यात लक्ष घालून त्यांना विशेष मार्गदर्शन करून भविष्यात होणाऱ्या चोऱ्या राेखाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.