हलग्यांचा कडकडाट अन् वाघ्या-मुरळीचा जागरण गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:13+5:302021-07-28T04:23:13+5:30
तालुकाध्यक्ष अमोल माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात येतील व हा ...
तालुकाध्यक्ष अमोल माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात येतील व हा रस्ता भक्तिमार्ग म्हणून मजबुतीकरण व रुंदीकरण करण्याचे कामही मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यानंतर निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले .
कुरूल ते पंढरपूर हा ३६ की.मी. रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त आहे. या मार्गावरून चारही वारीच्या वेळेला अनेक पालख्या व दिंड्या या मार्गाने पंढरपूरकडे जातात. या रस्त्याचे भक्तिमार्ग म्हणून रुंदीकरण व मजबुतीकरण व्हावे यासाठी मोहोळ तालुका समता परिषदेच्या वतीने कुरुल येथे रास्ता रोको आंदोलन व वाघ्या-मुरळीचा जागरण गोंधळ कार्यक्रम करण्यात आल्याचे जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी संचालक बापू भंडारे व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खारे यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खारे, उपाध्यक्ष बापू भंडारे, मोहोळ तालुकाध्यक्ष अमोल माळी, पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिवसेना तालुकाउपप्रमुख विनोद आंबरे, तालुका उपाध्यक्ष रफिक आत्तार, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, धनाजी माळी, अवधूत माळी, आकाश जाधव, बाबा देवकर, बापू ननवरे, गणेश ननवरे, प्रमोद ननवरे, आनंद पाटील, महेश धनुरे, ऋषिकेश ननवरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
----
पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचा डीपीआर तयार केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. कुरुल गावापासून सहाशे मीटर रस्ता ठेकेदारांच्या कंपनीने मुरूम उपसाची जड वाहतूक केल्याने रस्ता खचून खराब झालेला आहे. कंपनीने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा यासाठी त्यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र कंपनीने अद्याप रस्ता दुरुस्त केला नाही व उत्तरही दिले नाही. याबाबत नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
किरण हबीब, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
----