अपंगांनी हेल्पलाईनची मदत घ्यावी : जाधव

By admin | Published: December 10, 2014 07:28 PM2014-12-10T19:28:49+5:302014-12-11T00:00:53+5:30

१०९७ या हेल्पलाईनची १४ ते १८ वर्षांवरील अपंग मुलांना सक्षम बनविण्यासाठी रोजगार दिला जातो

Handicapped help seek help: Jadhav | अपंगांनी हेल्पलाईनची मदत घ्यावी : जाधव

अपंगांनी हेल्पलाईनची मदत घ्यावी : जाधव

Next

सावंतवाडी : आज अपंग व्यक्तींना सहानुभूतीची गरज आहे. त्यांना चांगली वागणूक मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना अपंगांना मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी अपंगांनी १०९७ या हेल्पलाईनची मदत करून घ्यावी, असे मत दिवाणी न्यायाधीश हेमलता जाधव यांनी मांडले. येथील तालुका विधी सेवा समितीच्यावतीने येथील न्यायालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डी. आर. पठाण, वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शामराव सावंत, अपंग समावेशतज्ज्ञ गोपाळ गावडे, अ‍ॅड. माधवी पेंडुरकर, अ‍ॅड. भाग्यश्री भोसले, डॉ. शुभदा करमळकर, गटविकास अधिकारी शरद महाजन, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, आदी उपस्थित होते.
यावेळी गोपाळ गावडे म्हणाले, १४ ते १८ वर्षांवरील अपंग मुलांना सक्षम बनविण्यासाठी रोजगार दिला जातो. तसेच शासकीय वेगवेगळ््या योजना, सेवा-सुविधा दिल्या जातात. त्याचा अपंग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. शुभदा करमळकर यांनी एडस् या आजाराबाबत मार्गदर्शन केले. े भाग्यश्री भोसल यांनी सूत्रसंचालन, तर अ‍ॅड. माधवी पेंडुरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Handicapped help seek help: Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.