कुर्डूवाडीत राबत आहेत स्वच्छतादूतांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:36+5:302021-04-18T04:21:36+5:30

कुर्डूवाडी शहरात सध्या १५६ कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्यासाठी श्रीराम मंगल कार्यालयात डॉ.शुभम खाडे यांच्या नेतृत्वाखाली कोविड केअर सेंटर ...

The hands of the cleaning envoys are working in Kurduwadi | कुर्डूवाडीत राबत आहेत स्वच्छतादूतांचे हात

कुर्डूवाडीत राबत आहेत स्वच्छतादूतांचे हात

Next

कुर्डूवाडी शहरात सध्या १५६ कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्यासाठी श्रीराम मंगल कार्यालयात डॉ.शुभम खाडे यांच्या नेतृत्वाखाली कोविड केअर सेंटर वर्षभरापासून कार्यरत आहे. सध्या हे सेंटर रुग्णांनी हाउसफुल्ल झाले आहे. अशा स्थितीत शौचालयाची स्वच्छता केली जात आहे.

---

ते सहा स्वच्छतादूत

लखन वाल्मिकी, अर्जुन रजपूत, दिगंबर गोडसे, ब्रिजपाल वाल्मिकी, शिवाजी खवळे, मारुती खिलारे हे सहा कर्मचारी नियोजनपूर्वक स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत आहेत. या कामाचे विशेष कौतुक होत आहे.

---

शहरात ८० स्वच्छतादूत

कुर्डूवाडी नगरपालिका आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या देखरेखीखाली शहराची स्वच्छता होत आहे. त्यांच्या या कार्यात ८० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे. त्यापैकी सहा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छता मोहिमेची जबाबदारी सोपविली आहे.

---

फोटो : १७ कुर्डूवाडी हेल्थ

कुर्डूवाडी शहरात श्रीराम मंगल कार्यालय कोविड केअर सेंटरची स्वच्छता करताना स्वच्छतादूत.

Web Title: The hands of the cleaning envoys are working in Kurduwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.