चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गौडगावात हनुमान जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:36+5:302021-04-28T04:23:36+5:30
अक्कलकोट : गौडगांव येेथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात मंंगळवारी रुद्राभिषेक व होमहवन करून हनुमान जयंती साजरी करण्यात ...
अक्कलकोट : गौडगांव येेथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात मंंगळवारी रुद्राभिषेक व होमहवन करून हनुमान जयंती साजरी करण्यात आली. केवळ चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
गौडगांवच्या जागृत मारूती मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी होते. यंदा कोरोनामुळे धार्मिक विधींना फाटा देत हनुमान जयंती साजरी करण्यात आली. गतवर्षाप्रमाणे यंदाही ना भजन, ना कीर्तन. फक्त मारूतीला रूद्राभिषेक, नवग्रह, होमहवन, महाभिषेक व महाआरती या धार्मिक कार्यक्रमांनी विधी पार पडला. काही भक्तांनी हनुमान चालीसा, मंत्रपठण करून मंदिर परिसरात भक्तांनी भक्तीचा माहोल निर्माण केला. गत वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे मंदिरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाही. अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्यासह चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरा करण्यात आले.
--
२६ गौडगाव हनुमान
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील जागृत गौडगाव हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.