हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली !
By Appasaheb.patil | Published: April 19, 2019 12:47 PM2019-04-19T12:47:46+5:302019-04-19T12:48:10+5:30
परभणीच्या भाविकाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाखांची दिली देणगी
सोलापूर : चैत्री पोर्णिमा व हनुमान जन्मोत्सवनिमित्त पंढरपूर येथील श्री. विठ्ठल गाभाºयास रुईच्या पानाची आरास करण्यात आली़ विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने ही आरास करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. यातच पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रशासन मागे न राहता मंदिर समितीने हनुमंताला आवडणाºया रूईच्या पानाने विठ्ठलाच्या गाभाºयास आकर्षक सजावट करून मनमोहक रूप बनविले आहे. गाभाºयात करण्यात आलेली सजावट राज्यभरातून आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
परभणी येथील भाविक सरस्वती पंडितराव पांगरकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाख रुपयाची देणगी दिली़ यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ व श्रीची प्रतिमा देऊन सत्कार केला़ यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.