बाळीवेशीत आनंद; अन् त्या चार दिवसाच्या बाळाचा अहवाल आला निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 09:51 AM2020-06-14T09:51:40+5:302020-06-14T09:55:20+5:30
बाळ आजीकडे घरी सुखरूप; आई पॉझीटिव्ह असल्याने घेतेय रुग्णालयात उपचार
सोलापूर : बाळंतपणानंतर आई पॉझीटिव्ह निघाल्याने चार दिवसाच्या बाळाची टेस्ट घेतल्यानंतर बाळीवेशीतील ते कुटुंब तणावात होते, अन् शनिवारी सायंकाळी त्या बाळाचा रिर्पोट निगेटिव्ह आल्यावर आजी आजोबांसह परिसरातील लोकांना आनंद झाला.
बाळीवेशीतील सारडा प्लॉटजवळ राहणाºया एका महिलेस बाळंतपणासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलगा झाल्यानंतर ती आजारी पडली. संबंधित रुग्णालयाने तिची चाचणी केल्यावर पॉझीटिव्ह आली. त्यामुळे चार दिवसाच्या बाळाला तिच्या आजीकडे सुपुर्द करून तिला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्या संपर्कात ते बाळ आल्याने त्याचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. स्वॅब नेल्यापासून बाळाच्या कुटुंबियासह परिसरातील लोकांना चिंता लागून राहिली होती. शनिवारी रात्री प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यावर ते बाळ निगेटीव्ह असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. तेव्हा आजी आजोबासह नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
अन् त्या दोघांना परत नेले...
सलगरवस्ती परिसरातील दोन तरुणांना संपर्कातून संस्थात्मक क्वारंटाईनसाठी नेण्यात आले होते. आठ दिवसानंतर रिर्पोट निगेटिव्ह असल्याचे सांगून त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे ते तरुण घरी येऊन आनंदाने फिरत असतानाची महापालिकेच्या आरोग्य विभागाची व्हॅन आली व तुमचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे असे सांगून त्यांना परत नेण्यात आले. नाराज झालेले ते तरुण उपचारासाठी जाण्यास तयार नव्हते. शेवटी स्थानिक नगरसेवकांनी त्यांची समजूत घातल्यावर ते परत गेले आहेत.