मोलकरणीसारखी वागणूक देत कर्ज फेडण्यासाठी पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Published: September 25, 2022 04:13 PM2022-09-25T16:13:05+5:302022-09-25T16:15:46+5:30

या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोलीस नाईक सोनार करत आहेत.

Harassing wife to bring money to pay off debt by treating her like a maid; Crime against four including husband | मोलकरणीसारखी वागणूक देत कर्ज फेडण्यासाठी पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

मोलकरणीसारखी वागणूक देत कर्ज फेडण्यासाठी पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

Next

सोलापूर : पत्नीला वारंवार अपमानित करत मोलकरणीसारखी वागणूक देत कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख वीस हजार रुपये घेऊन ये असे म्हणत तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी चार जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नाजिया बानू सोहेल नदाफ ( वय २५, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक २, चांद तारा मशीद शेजारी ) यांनी विजापूर नाका पोलिसांना दिली आहे.

फिर्यादी नाझिया नदाफ यांना आरोपी सोहेल इलाही नदाफ, मुमताज इलाही नदाफ, महताबी मोहम्मद नदाफ ( सर्व रा. कारंजा चौक, बुधवार पेठ, अक्कलकोट ) व निलोफर नासिर नदाफ ( रा. भूम, उस्मानाबाद ) यांनी फिर्यादीला जेवायला न देता उपाशी ठेवत घालून पाडून बोलत मानसिक त्रास दिला. तर पती याने दारू पिऊन मारहाण करत मोलकरणीसारखी वागणूक दिली. शिवाय आरोपींनी सोहेल नदाफ यास भडकावून दमदाटी केली. अशा आशयाची फिर्याद नाजिया नदाफ यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोलीस नाईक सोनार करत आहेत.

Web Title: Harassing wife to bring money to pay off debt by treating her like a maid; Crime against four including husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.