बाथरुममध्ये शिरुन महिलेशी अश्लील वर्तन अन् अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास
By विलास जळकोटकर | Updated: August 28, 2024 19:42 IST2024-08-28T19:41:38+5:302024-08-28T19:42:38+5:30
तरुणाविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक छळाचा गुन्हा

बाथरुममध्ये शिरुन महिलेशी अश्लील वर्तन अन् अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास
सोलापूर : बाथरुममधून अंघोळ करुन बाहेर पडणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अन् महिलेच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास दिल्यावरुन एका तरुणाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. शहरानजीकच्या एका नगरात सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. सिनेश जदार्धन रणशूर (वय २८) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पडित फिर्यादी ही शहरानजिकच्या नगरात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ती बाथरुममधून अंघोळ करुन बाहेर येत असताना नमूद आरोपीने बाथरुमचा दरवाजा ढकलून आत आला. ओरडू नका म्हणत ठार मारण्याची धमकी दिली आणि लज्जास्पद वर्तन केले. तसेच चार वर्षांपासून पिडितेच्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवरुन मेसेज पाठवून पाठलाग करुन नमूद आरोपी त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८,३५१(२), सह पोक्सोचे कलम १२ अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास महिला फौजदार सुतार करीत आहेत.