कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ, पतीसह गुजरातच्या सहा जणांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: November 12, 2022 04:08 PM2022-11-12T16:08:41+5:302022-11-12T16:09:34+5:30
कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुजरातच्या पतीसह सहा जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर: कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुजरातच्या पतीसह सहा जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अनुसया हार्दीककुमार पटेल ( वय ३२, रा. सिटीझन पार्क, नवीन आरटीओ ऑफिस जवळ) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुजरातमधील विजापुरमधील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अनुसया यांचे आरोपी पती हार्दिककुमार मनुभाई पटेल याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपीच्या कुटुंबीयांना अनुसया यांना चांगले नांदविले. त्यानंतर कार घेण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच पती हार्दिककुमार याने बँकेत जाॅईट अकाऊंट काढण्याच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद अनुसया यांनी दिली आहे.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती हार्दिककुमार पटेल, सासरा मनुभाई पटेल, सासू ज्युतिका पटेल, दीर सविन पटेल (सर्व रा. बहुचारपुरा, गांधीनगर, गुजरात) व नणंद निकेता गतेंद्रसिंह विहोल, नंदवा गजेंद्रसिंह विहोल ( रा. शामविहार, विजापूर, गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"