दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांसह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:39+5:302021-09-15T04:27:39+5:30

पाच संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : कुंभारी हद्दीत विडी घरकुल परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत ...

With hardened criminals preparing for a robbery | दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांसह

दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांसह

Next

पाच संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : कुंभारी हद्दीत विडी घरकुल परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांसह पाच संशयितांवर वळसंग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर बिडी घरकुलधारक क्रांती चौकात ही घटना घडली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान वळसंग पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना क्रांती चौकातील होनराव डेअरीच्याजवळ पाचजण विनाकारण फिरत होते. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या संशयितांना हटकले तेव्हा घाबरून त्यांची बोबडी वळली. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगांची झडती घेतली असता त्यात डेल कंपनीचा लॅपटॉप, ५ मोबाईल , स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सळई आदी वस्तू आढळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच या वस्तू त्यांनी हैदराबादमधून चोरल्याचे कबूल केले. अधिक चौकशीअंती चौकातील शॉपिंग सेंटरमधील मेडिकल आणि किराणा दुकाने फोडण्याचा त्यांचा इरादा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पाचही जणांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी शिवा ऊर्फ शिवप्रसाद राजू कैंची (२१, रा. क विभाग, घरकुल, कुंभारी), जमीर ऊर्फ जम्मू रशीद शेख (कुंभारी), प्रेम भास्कर कुणी (२३, एमआयडीसी सोलापूर), राजू श्रीनिवास कुडक्याल (२३, रा. मीनाक्षी घरकुल, कुंभारी), अमन मुस्ताक चितापुरे (२१, रा. क विभाग, विडी घरकुल, कुंभारी) यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल रोहित थोरात यांनी फिर्याद दिली आहे. पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हंचाटे अधिक तपास करत आहेत.

------

तेरा गुन्ह्यांतील आरोपी गजाआड

या प्रकरणातील शिवा ऊर्फ शिवप्रसाद राजू कैंची याच्यावर सोलापूर, पुणे, जालनासह महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राजू श्रीनिवास कुडके याच्यावर ही जेल रोड पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Web Title: With hardened criminals preparing for a robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.