हसापुरात घराला आग, पाच लाखांचे लग्नाचे साहित्य जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:14+5:302020-12-07T04:16:14+5:30
हसापूर येथील दीक्षित सोमनाथ दुपारगुडे यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली. तेव्हा ग्रामस्थांनी विझवण्याचा प्रयत्न केला तरी आग आटोक्यात ...
हसापूर येथील दीक्षित सोमनाथ दुपारगुडे यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली. तेव्हा ग्रामस्थांनी विझवण्याचा प्रयत्न केला तरी आग आटोक्यात आली नाही. लागलेल्या आगीत लग्नात आलेले २ लाख ५० हजारांचे पाच तोळे सोने, ७ हजार ५०० रुपये किमतीचे ११ तोळे चांदी, ६५ हजारांची रोख रक्कम, ३६ हजारांचे पत्र्याचे ३० नग, ८ हजारांचे ४० वासे, १२ हजारांचे एक लोखंडी कपाट, १८ हजारांचा एक सोफासेट, १० हजारांचा टीव्ही, २० हजारांचे दोन कुलर, २५ हजारांचा पलंग आदी या लग्न साहित्यासह ज्वारी १ पोते, गहू १ पोते, तांदूळ अर्धा क्विंटल, कपडे, चादरी, सतरंजी असे विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. एकंदरीत ५ लाख रुपये किमतीचे साहित्य जळून नुकसान झाले आहे. याचा पंचनामा हसापूरचे तलाठी एन. के. मुजावर यांनी केला आहे. याबाबतचा अहवाल तलाठी यांनी तहसीलदार यांना सादर केला आहे.
फोटोओळ
०६अक्कलकोट०१
हसापूर, ता.अक्कलकोट येथील दुपारगुडे यांच्या घराला अचानकपणे लागलेल्या आगीत विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.