पेट्रोलिंग करताना हातभट्टी दारू पकडली; दोघांना सोलापूर पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:44 AM2020-07-17T10:44:13+5:302020-07-17T10:45:39+5:30

सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कामगिरी; ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Hatbhatti caught alcohol while patrolling; Both were arrested by Solapur police | पेट्रोलिंग करताना हातभट्टी दारू पकडली; दोघांना सोलापूर पोलिसांनी केली अटक

पेट्रोलिंग करताना हातभट्टी दारू पकडली; दोघांना सोलापूर पोलिसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कामगिरीसोलापुरात आजपासून कडक् संचारबंदी सुरू

सोलापूर : जोडभावी पेठ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दहिटणे परिसरात दोघे जण वेगवेगळ्या मोटारसायकलवर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. त्यांच्याकडून ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी मध्यरात्री गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी ही कामगिरी केली.

दरम्यान, सुरेश उर्फ अप्पू हरिबा पवार (वय ३७ वर्षे राहणार पोचू तांडा बक्षी हिप्परगा) यास त्याचे ताब्यातील  एमएच १३ सीए ८६५२ या मोटरसायकलवर वेगवेगळ्या आकाराचे सहा काळया रंगाचे रबरीट्युबमध्ये अंदाजे २५० लिटर  हातभट्टी दारू व मोटरसायकलसह किंमत ३७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमालासह पकडला. तर श्रीकांत देसू राठोड (वय २८ वर्षे, रा. सीताराम तांडा, बक्षी हिप्परगा) यास एमएच १३ बी.सी. ५७२७ या मोटरसायकलवरून  सात काळे रंगाच्या रबरी ट्युब मध्ये सुमारे ३४० लिटर हातभट्टी दारू व मोटरसायकल सह किंमत ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. 


दरम्यान, कारवाईमधील आरोपी सुरेश उर्फ अप्पू हरिबा पवार व श्रीकांत देसू राठोड यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस हवालदार बाबर कोतवाल, पोलीस नाईक संदीप जावळे, विनायक बर्डे, पोलीस शिपाई उमेश सावंत, समर्थ शेळवणे, स्वप्नील कसगावडे, प्रफुल गायकवाड यांच्या पथकाने केली.

Web Title: Hatbhatti caught alcohol while patrolling; Both were arrested by Solapur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.