हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त ; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:24+5:302021-07-25T04:20:24+5:30
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस हवालदार आप्पासो पवार, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, ...
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस हवालदार आप्पासो पवार, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले यांच्या पथकाने शुक्रवारी माेहिमेंतर्गत चव्हाण वस्तीवर सुरू असलेल्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाडी टाकल्या.
या कारवाईत विठ्ठल चव्हाण व अमोल मंडले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६०० लिटर गूळ मिश्रित रसायन, २० लिटर तयार हातभट्टी दारू, ४ नवसागरकांड्या असा १२,८४७, सेवागिरी चव्हाण याच्याकडून ४०० लिटर गूळ मिश्रित रसायन, ५०० किलो गूळ, २० लिटर तयार हातभट्टी दारूसह ४ नवसागरकांड्या, १ किलो युरिया असा २८ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांना पाहून संतोष मधुकर चव्हाण हा तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याच्या घरासमोर ४०० लिटर गूळ मिश्रित रसायन, २० लिटर हातभट्टी तयार दारू, ४ नवसागराच्या कांड्या, १ किलो युरिया असा ८,८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस काॅन्स्टेबल धुळा चोरमले, पोलीस काॅन्स्टेबल रामचंद्र जाधव यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सेवागिरी बाळू चव्हाण, विठ्ठल दत्तू चव्हाण, अमोल पकड मंडले व संतोष मधुकर चव्हाण (रा. महिम-चव्हाण वस्ती, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.