पैलवान झाला करमाळा पंचायत समितीचा सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:29+5:302021-07-10T04:16:29+5:30
सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ठरली होती. त्यानुसार पैलवान अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ...
सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ठरली होती. त्यानुसार पैलवान अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
१ जुलैला पंचायतीच्या सभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार बैठकही सुरू झाली होती. या बैठकीत पैलवान अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध ठरली होती. दरम्यान बिनविरोध निवडीची घोषणा जाहीर होण्यापूर्वी अपक्ष पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी या निवडीपूर्वी सात दिवस अगोदर बैठकीचा अजेंडा येणे आवश्यक असताना तो अजेंडा आला नाही. त्यामुळे ही निवडणूक तहकूब करावी; अशी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने नियमानुसार ती बैठक तहकूब केली व ९ जुलैला सभापती निवडीच्या नोटिसा काढल्या.
त्यानुसार सभापती निवडीची बैठक शुक्रवारी पार पडली. पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडीप्रसंगी उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रा. अर्जुन सरक, बिभीषण आवटे, राजेंद्र कदम, पंचायत समिती सदस्या केशरताई चौधरी, देवानंद बागल, विशाल गायकवाड यांच्यासह पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
०९अतुल पाटील