खिडकीतून कडी काढून घरात प्रवेश केला, रोकडसह १२ लाखांचा ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:18+5:302021-02-06T04:40:18+5:30
याबाबत कालिंदा ईश्वर मुंढे (वय ५१, रा. सुभाषनगर, ताडसौंदणे रोड, बार्शी) यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसात फिर्याद देताच पोलिसांनी सहा ...
याबाबत कालिंदा ईश्वर मुंढे (वय ५१, रा. सुभाषनगर, ताडसौंदणे रोड, बार्शी) यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसात फिर्याद देताच पोलिसांनी सहा अज्ञात आरोपींच्या विरुद्ध भादंवि ३९५ अन्वये गुन्हा नोंदला आहे. यात चार लाख ७१ हजारांचे ३५ ग्रॅम सोन्याचे एक लॉकेट व ७० ग्रॅमचे नक्षीदार २ गंठण, २ लाख ९२ हजार रुपयांच्या ११ अंगठ्या, ९० हजारांचे २० ग्रॅम मिनी गंठण, ६८ हजारांचे १५ ग्रॅम झुबे, २७ हजारांच्या दोन लेडीज अंगठ्या, एक लाख ३४ हजारांची कर्णफुले, सोन्याचे गंठण, बोरमाळ, गळ्यातील बदाम, लहान मुलांची अंगठी, १० हजारांचे ४ चांदीचे पैंजणजोड व रोख ४० हजारांची रोकड अशी १२ लाखांची चोरी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कालिंदा गुरुवारी दिवसभराचे काम आटोपून नातवंडांसह झोपल्या. मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास चौघा चोरट्यांनी खिडकीतून लाकडी बांबूने दरवाजाची कडी काढून चौघांनी प्रवेश केला. अचानक फिर्यादीला धक्का लागल्याने त्या जागे झाल्या. त्यावेळी त्यांना चोरट्याच्या हातात सुरा, तर दुसऱ्याच्या हातात लाकडी दांडके होते. त्यातील एकाने मोठ्याने ओरडून माल कोठे आहे विचारले. महिला मोठ्याने ओरडत असताना खिडकीतील एकाने तिच्या तोंडावर गोधडी टाकून दाबून धरले आणि कपाटातील रोख रक्कम आणि दागिने पळवून नेले. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.
कडी लावून चोरटे पळाले
चोरट्यांनी लोखंडी कपाट उचकटून सोन्याचे दागिने ठेवलेला पितळी डबा व सॅक घेऊन जाताना दरवाजास बाहेरून कडी लावली आणि पळून गेले. त्यानंतर कालिंदी मुंडे यांनी आरडाओरड केली. आवाजाने शेजारी जागे झाले. त्यांनी येऊन कडी उघडली. त्यानंतर त्यांनी ही चोरीची घटना सांगितली.
-