दवंडी देऊन शेतकऱ्यांना बोलावले, तलाठ्यानेच मारली बैठकीला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:43+5:302021-03-18T04:21:43+5:30
मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक ...
मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीपासून अनेक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही त्यांच्या उताऱ्यावर इतर हक्कात औद्योगिक वसाहत नोंद केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आम्ही वारंवार विरोध केल्यानंतरही शासन आमच्या उताऱ्यावरील बोजा कमी करत नसल्यामुळे शेतीची खरेदी-विक्री करताना तसेच बँकेचे कर्ज काढताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची संमती अथवा विरोध आहे, अशा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे काम सुरू आहे. सध्या सुगीचे दिवस सुरू असताना ही शेतकऱ्यांना बोलावून घेतले जाते. तसेच पुन्हा शेतक-यांना बोलावून घेतले. मात्र त्या बैठकीला तहसीलदार, तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी संतापले असून औद्योगिक वसाहत नोंद कमी न झाल्यास तलाठी कार्यालयास कुलूप लावून गाव बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रभाकर कोरे, अप्पाराव कोरे, बाबुराव मेंडगुदले, अनिल मेंडगुदले, बसवराज कुंभार, प्रवीण कुंभार, सदाशिव जोडमोटे, मलकारसिध्द जोडमोटे, अमोगसिध्द हजारे, नामदेव हजारे, मलकारसिध्द गुंजाटे, महादेव कुंभार, मल्लीनाथ जोडमोटे, बाबुराव कोळी यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.