‘तो’ वानर अनेकांचा मित्र झालेला, पण शेवटी केला वृद्धेचा घात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 08:09 PM2019-03-22T20:09:09+5:302019-03-22T20:10:39+5:30

अरूण लिगाडे  सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष ...

'He' has many friends with monkeys, but ultimately the power of old man ... | ‘तो’ वानर अनेकांचा मित्र झालेला, पण शेवटी केला वृद्धेचा घात...

‘तो’ वानर अनेकांचा मित्र झालेला, पण शेवटी केला वृद्धेचा घात...

googlenewsNext
ठळक मुद्देफेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होतागेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यासवानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला

अरूण लिगाडे 

सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष केले. अनेक  दिवस याच गावात राहिल्याने तो अनेकांचा मित्र झालेला़ हा माणसाळलेला  वानर असे करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, पण कोण त्याच्या खोड्या केल्या की तो चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात बुधवारी घडलेल्या घटनेनंतर या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली. घडनेमुळे गावकरी सुन्न होते. मात्र माणसाळलेले वानर असे का वागले याचा मात्र गावकºयांना मोठा धक्का बसला आहे.

या वानराच्या संदर्भातील अनेक प्रसंग गावकºयांनी ऐकविले. एकदा गावात आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रम संपेपर्यंत ठाण मांडून होते. तसे पाहिले तर तो माणसाळलेलाही असल्याचे लोक सांगतात, पण लहान मुलांनी त्याची खोडी काढली की तो त्यांच्यावर धावून हाताचा चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थ सांगतात.

गावानजीक जवाहर विद्यालयातील शालेय मुलांना या वानराचा खूप उपद्रव होऊ लागल्याने मुख्याध्यापकांनी वन विभागास लेखी पत्र देऊन त्याला पकडण्याची विनंती केली होती.

गावात डॉल्बी, स्पीकरचा आवाज आला, अगर ज्या ठिकाणी कार्यक्रम असे त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपेपर्यंत बसून राहायचा़ त्याला संगीताची आवड निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील घंटागाडीच्या सायरनचा आवाज सुरु झाला की तो घंटागाडीवर पटकन जाऊन बसायचा. मग घंटागाडीचे गावातील काम संपले की तो पुन्हा चिंचेच्या झाडाखाली येत असे. 

फेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर ७ मार्च रोजी गोल्डन चौकात दुपारी ३ ते ५ या कालावधीत अंगावर जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याने जाळे हिसकावून पळ काढला. त्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु तो अद्याप सापडला नाही, असे सांगण्यात आले.

यांना घेतला वानराने चावा
- या नर वानराने गावातील महादेव जगधने, आदिनाथ मणेरी, आबा खताळ, पप्पू कांबळे, सोनाबाई गेजगे, जवाहर विद्यालयातील सारिका गेजगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले करून हाताला चावा घेतल्याचे नागेश ककमिरे, जावेद आतार व परमेश्वर गेजगे यांनी सांगितले.

सरपंच, गावातील पुढाºयांनी वन विभागाला या नर वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी, तोंडी केली होती. परंतु वनविभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे वानराच्या हल्ल्यात माझ्या आईचा बळी गेला आहे. अशी घटनांची वाट न पाहता या वानराला पकडून गाव भयमुक्त करावे़
- संतोष सुतार 

सदाभाऊचा बनला मित्र
- हा वानर गावातील सदाभाऊ खुळपे यांना मात्र काहीही करत नसे. उलट तो त्यांच्याजवळ जातो. जवळ गेल्यानंतर सदाभाऊ त्याचे अंग टॉवेलने पुसतात, त्याला पिण्यास पाणी देतात, खायला देतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या गोंजारण्यामुळे वानर त्यांचा चांगला मित्रही बनला आहे. मात्र जेव्हा या वानराने गावातील कृष्णाबाई सुतार यांच्यावर हल्ला करून त्या मयत झाल्याचे समजले तेव्हा सदाभाऊंना विश्वासच बसला नाही. 

गेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यास आहे. वानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत करावी़
- कय्युम आत्तार, सरपंच, घेरडी

Web Title: 'He' has many friends with monkeys, but ultimately the power of old man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.