म्हणे, महाराज गेले तपश्चर्याला, सत्यशोधन समितीला गेटवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:26 AM2021-09-04T04:26:56+5:302021-09-04T04:26:56+5:30
उंदरगाव येथील मनोहरमामा यांच्या भक्ताकडून आलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन समितीचे केदारीनाथ सुरवसे, निशा भोसले, प्रा.अशोक ...
उंदरगाव येथील मनोहरमामा यांच्या भक्ताकडून आलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन समितीचे केदारीनाथ सुरवसे, निशा भोसले, प्रा.अशोक कदम, बुवाबाजी विरोधी पथकाचे प्रमुख यशवंत फरतडे, अंजजी नानन, लता ढेरे, विनायक माळी, प्रमोद माळी व काही पदाधिकारी यांनी शुक्रवारी (दि.०३) उंदरगाव येथे भेट दिली. मनोहर भोसले यांच्या विरोधात बुवाबाजीची पोलिसांत तक्रार करणारे रवींद्र म्हेत्रे, उंदरगाव येथील सरपंच नाळे, धनंजय कांबळे, नामदेव कांबळे यांच्यासह इतर तक्रारदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर मनोहर भोसले यांना भेटण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम आश्रमाकडे रवाना झाली. तेथे गेटवर एकाने महाराज येथे आत नाहीत. ध्यानधारणा व तपश्चर्या करण्यासाठी बाहेर गेले आहेत, असे सांगून आतमध्ये जाऊ दिले नाही. आश्रमात दहा ते बारा धिप्पाड युवक असल्याचे अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन समितीने उंदरगाव येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना विश्वास दिला असून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. उद्या सोलापुरात यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून यानंतर अंनिसचे प्रमुख हमीद दाभोळकर यांना अहवाल पाठविण्यात येणार आहे.
........
लोक भयभीत
उंदरगावातील लोक सध्या भयभीत झाले आहेत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन करून भयमुक्त राहण्यास सांगितले. याबाबतचा अहवाल अंनिसचे प्रमुख हमीद दाभोळकर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
-यशवंत फडतरे, प्रमुख, बुवाबाजी विरोधी पथक
.........
हिशोब करून दंडाची आकारणी
उंदरगावच्या आश्रमात वीज कंपनीच्या पोलवरून बेकायदा वीज घेतल्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. वीज किती व कधीपासून वापरली. याचा हिशोब करून लवकरच दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.
-सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
.........
फोटो ओळी
उंदरगाव (ता. करमाळा) येथील आश्रमाला भेट देऊन पाहणी करताना सत्यशोधन समितीचे केदारीनाथ सुरवसे, निशा भोसले, प्रा.अशोक कदम, यशवंत फरतडे, अंजजी नानन, लता ढेरे आदी.
.........
(फोटो ०३करमाळा उंदरगाव