झोपूनच त्यांनी दाबला हाताने बंदुकीचा ट्रिगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:20+5:302021-05-11T04:23:20+5:30
हत्तुरचे माजी सरपंच इब्राहीम नदाफ यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली. ज्या बंदुकीतून त्यांनी कानशिलाच्यावर नेम धरला. ...
हत्तुरचे माजी सरपंच इब्राहीम नदाफ यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली. ज्या बंदुकीतून त्यांनी कानशिलाच्यावर नेम धरला. त्या बंदुकीची लांबी साडेतीन फुटाची आहे. स्वतःवर गोळी झाडण्यासाठी साडेतीन फूट लांबून ट्रिगर कसा दाबण्यात आला असावा, अशी शंका होती. त्यामुळे प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद वाटत होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील पंच नेमण्यापूर्वी काढलेल्या फोटोतून नदाफ यांनी जमिनीवर झोपून उजव्या हाताने ट्रिगर दाबल्याचे स्पष्ट होते.
मयत नदाफ यांच्या प्रेताचे पोस्टमार्टेम करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यांच्या डोक्यात घुसलेल्या गोळीचे चार छरे बाहेर काढण्यात आले. पोस्टमार्टेमनंतर मयताचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी अंबादास चव्हाण यांनी दिली.
टेस्ट पॉझिटिव्ह
इब्राहीम नदाफ यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात नदाफ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना पोलिसांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तपासकामात त्यामुळे अडथळा आल्याचेही सांगण्यात आले.