अकोले खुर्द येथून सव्वालाखाची कॉपर वायर चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:56+5:302021-02-07T04:20:56+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले खुर्द येथे टेंभुर्णी-करमाळा रोडलगत गणेश दत्तात्रय हांडे (४०) यांची गजराज इलेक्ट्रिकल ॲण्ड ...

He stole copper wire from Akole Khurd | अकोले खुर्द येथून सव्वालाखाची कॉपर वायर चोरीला

अकोले खुर्द येथून सव्वालाखाची कॉपर वायर चोरीला

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले खुर्द येथे टेंभुर्णी-करमाळा रोडलगत गणेश दत्तात्रय हांडे (४०) यांची गजराज इलेक्ट्रिकल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर ट्रान्सफाॅर्मर रिपेअरिंग कंपनी आहे. या कंपनीत शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे या कालावधीत अज्ञात चोरट्याने बाजूचा पत्रा कापून तांब्याची तार चोरून नेली. हांडे यांच्याकडे महावितरण बारामती डिव्हिजन तसेच ग्रामीण डिव्हिजनचे ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी आले होते. त्या ट्रान्सफॉर्मरमधील खराब झालेली २०० किलो कॉपर वायर व कॉपर ट्रिप ४५० किलो असे मिळून ६५० किलो (तांब्याची वायर) १ लाख ३० हजार रुपये किमतीचे स्क्रॅप मटेरिअल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याची बाजार भावाप्रमाणे किंमत पाच लाखांच्या घरात जाते.

कंपनीचे मॅनेजर विठ्ठल सरक हे कंपनीत झोपलेले होते. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या खोलीस बाहेरून कडी लावून टाकली होती. ते सकाळी झोपेतून उठले असता त्यांना बाहेरून कोणीतरी कडी लावली असल्याचे जाणवले. यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. कडी काढून त्यांना बाहेर काढले.

याबाबत गणेश हांडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.

Web Title: He stole copper wire from Akole Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.