पालखी तळावरील चौथऱ्यावर दुचाकी घेऊन केक कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:14+5:302021-06-22T04:16:14+5:30
वाखरी (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीचे शिपाई जितेंद्र ऊर्फ नाना दिगंबर पोरे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. यानिमित्त वाखरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड, ...
वाखरी (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीचे शिपाई जितेंद्र ऊर्फ नाना दिगंबर पोरे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. यानिमित्त वाखरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय लेंगरे, योगेश पांढरे, शंकर सलगर, विठ्ठल लोखंडे, सुधाकर शिंदे, रोहित गायकवाड, विश्वास कोळी, शिवाजी हाके, किरण कांबळे, जितेंद्र ऊर्फ नाना पोरे (सर्व रा.वाखरी, ता.पंढरपूर) हे सर्व जण मिळून मोटारसायकल (नं. एम.एच. १३ बी पी ५१५६) यासह श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या चौथऱ्यावर आले. त्यांनी मोटारसायकलवर केक ठेवून कापून जितेंद्र पोरे यांचा वाढदिवस साजरा केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागू केला आहे. तरीही वाखरी (ता.पंढरपूर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या चौथऱ्यावर एकत्र जमून वरील सर्वांनी वाढदिवस साजरा केला. यामुळे त्या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार टी.ए. मुंडे करीत आहेत.
----