शर्ट काढताना छताच्या फॅनला डोकं धडकल्यानं ‘तो’ जखमी
By विलास जळकोटकर | Updated: June 16, 2024 19:48 IST2024-06-16T19:48:00+5:302024-06-16T19:48:19+5:30
रुग्णालयात दाखल : सोलापुरात लोकू तांड्यावरील घटना

शर्ट काढताना छताच्या फॅनला डोकं धडकल्यानं ‘तो’ जखमी
सोलापूर : उंचीनं कमी असलेल्या पत्र्याच्या छताला असलेल्या फॅनला शर्ट काढताना एका प्रौढाचं डोकं धडकल्यानं त्याला जखमी व्हावं लागलं. शहरापासून जवळच असलेल्या लोकू तांड्यावर रविवारी हा प्रकार घडला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काशिनाथ बद्दू राठोड (वय- ४६, रा. लोकू तांडा, विजापूर रोड सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
यातील जखमी व्यक्ती काम आटोपून तांड्यावर पोहचल्यानंतर घरामध्ये शर्ट काढत होता. पत्र्याच्या घराची उंची कमी असल्याने छताला असलेल्या फॅनला त्याचे डोकं धडकल्यानं जखम होऊन रक्त भळाभळा येऊ लागला. या प्रकारानं घरातील लोकांचा एकच गोंधळ उडाला. जावई सतीश याने तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.