आई-मामाच्या लग्नाच्या वाढदिवसाला केक आणायला गेला अन् अपघातात तरुणाचा जीव गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:54+5:302021-05-10T04:21:54+5:30
रोहन राम व्हनकडे (वय २२) हा दोनच महिन्यांपूर्वी महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला लागला होता. आई कलावती अंगणवाडीची सेविका अन् ...
रोहन राम व्हनकडे (वय २२) हा दोनच महिन्यांपूर्वी महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला लागला होता. आई कलावती अंगणवाडीची सेविका अन् वडील राम हे मजुरीचे काम करतात. या दोघांनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला. या जाणिवेतून त्यांना मदत करण्याच्या जिद्दीने रोहन हा महावितरणमध्ये काम करत होता. मूळचे वळसंगचे असलेले व्हनकडे कुटुंब चपळगावला स्थायिक झाले होते. गावात मामा अनिल कांबळे असल्याने सतत त्यांच्या सान्निध्यात वावरलेल्या रोहनने आई-मामाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक शनिवारीच मिळवायचा, हा निश्चय केला.
...अखेर केक मिळविलाच
नेहमीप्रमाणे कामाला गेलेल्या रोहनने कर्जाळ गावातील काम संपवून अक्कलकोटचे मित्र कल्याणी मुनाळे (रा. काझीकणबस) याच्यासोबत केक आणण्यासाठी गेला. प्रयत्न करून त्याने केक मिळविल्यानंतर आनंदाने आपल्या मित्रासोबत चपळगावच्या दिशेने निघाला. अक्कलकोटनजीक पुलाजवळ ट्रकच्या धडकेने रोहनचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त घरी कळताच आईने अन् मामांनी हंबरडा फोडला.
फोटो
०९ रोहन व्हनकडे