निवडणूक झाल्यानंतर घेणार राजकीय संन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:27+5:302021-01-08T05:10:27+5:30

अकलूज ग्रामपंचायतीची नगर परिषद होण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न केला. त्यासाठी विरोधकांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करीत अकलूज नगर ...

He will retire after the election | निवडणूक झाल्यानंतर घेणार राजकीय संन्यास

निवडणूक झाल्यानंतर घेणार राजकीय संन्यास

Next

अकलूज ग्रामपंचायतीची नगर परिषद होण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न केला. त्यासाठी विरोधकांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करीत अकलूज नगर परिषद होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने ग्रामपंचायत निवडणूक घेऊ नये, असे राज्य सरकारने निवडणूक आयोगाला कळवले होते; परंतु निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय घेतला नाही.

निवडणूक लागल्याने यंदाच्या निवडणुकीत महाळुंग, नातेपुते, अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज न भरण्यासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा झाली होती. यामध्ये विरोधकांबरोबर चर्चा झाली. महाळुंग ग्रामपंचायतीप्रमाणे अकलूज येथेही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला.

या निर्णयाला शिवसेनेचे आण्णा कुलकर्णी, दत्ता पवार, नामदेव वाघमारे, आर. पी. आय.चे नंदू केंगार, किरण धाईंजे, भागवत गायकवाड, अकलूजमधील मोरे, गायकवाड, भोसले परिवाराच्या मंडळीने गावच्या विकासासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची सहमती दर्शवत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ७० टक्के विरोधकांनी सहमती दर्शविली; पण काहींना मान्य नव्हते. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यश न आल्याने नाइलाजाने इच्छा नसताना निवडणूक लढवावी लागत आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ७ वर्षे गावचा कारभार चालविला. तर १३ वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करीत गावचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अकलूजची जनता मोहिते-पाटील परिवारावर प्रेम करणारी आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता काम करण्याची विजयदादांनी शिकवण दिली आहे.

अकलूजमध्ये एक जागा बिनविरोध झाली. ती वैयक्तिक लक्ष न दिल्याने झाली. प्रभाग ५ मधील बागवान नावाच्या आमच्या गटाच्या महिला उमेदवाराने माझ्या नावाचा वापर करून फसगत करीत अर्ज माघारी घेतला गेल्याने या प्रभागातील जागा बिनविरोध झाली असल्याचे सांगून या कालावधीत आपण बंधूच्या विवाहानिमित्ताने बाहेरगावी होतो. गावपातळीवर काम करणाऱ्याने त्या जागेच्या पूरक उमेदवारी अर्जात ओबीसी प्रवर्ग भरला गेला. या चुकीचीही आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: He will retire after the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.