गटशिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश झुगारणारे मुख्याध्यापक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:09+5:302021-02-05T06:43:09+5:30
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत पत्र्याचे शापिंग सेंटर उभारले आहे. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाल्याचे पत्र ...
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत पत्र्याचे शापिंग सेंटर उभारले आहे. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाल्याचे पत्र मुख्याध्यापक कोळी यांनी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना २६ नोव्हेंबर रोजी दिले होते. या पत्राच्या संदर्भाने गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी दि. ९ डिसेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने
अतिक्रमण काढून टाकावे विरोध झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र काढले होते. हे पत्र घेण्यासाठी मुख्याध्यापक कोळी हे कार्यालयात आले व पत्र वाचून निघून गेले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेसमोर पत्र्याचे शाॅपिंग सेंटर उभा करून शाळेचा रस्ता बंद करणाऱ्यांना अभय मिळाले आहे. त्यामुळेच आज मंदिरात भरणाऱ्या वर्गात मुलींना गैरहजर राहावे लागत आहे.
कोट
तिऱ्हे शाळेसमोर अतिक्रमण करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या मदतीने गुन्हा दाखल करण्याचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काढले होते. ते पत्र घेऊन जाण्यासाठी मुख्याध्यापकांना निरोप दिला. मात्र मुख्याध्यापकांनी पत्र घेतले नाही.
- नागनाथ स्वामी
केंद्रप्रमुख, देगाव