बांधकाम मंडळातर्फे महिलांमध्ये आरोग्यविषक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:51+5:302021-01-08T05:10:51+5:30

वैराग : सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूरमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग (२) अंतर्गत आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून महिला आरोग्य जागरूकता ...

Health awareness among women by the construction board | बांधकाम मंडळातर्फे महिलांमध्ये आरोग्यविषक जनजागृती

बांधकाम मंडळातर्फे महिलांमध्ये आरोग्यविषक जनजागृती

Next

वैराग : सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूरमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग (२) अंतर्गत आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून महिला आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले. कार्यकारी अभियंता विलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या शिबिरात बार्शीच्या स्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रभावती लाड यांनी उपस्थित आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रा.पं.सफाई कामगार महिला यांना स्रियांचे आजार व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी सहायक अभियंता सौरभ होनमुटे, शाखा अभियंता उल्हास जगताप, दराडे, गुंड, बांधकाम विभाग कर्मचारी रमेश कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन प्रशांत भालशंकर यांनी केले. आभार अभियंता उल्हास जगताप यांनी मानले. -----

फोटो - ०६ वैराग

वैराग येथे आरोग्य शिबिराप्रसंगी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Health awareness among women by the construction board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.