लोणी-नाडीच्या त्या ग्रामपंचायत सेवकाची आरोग्य सेवा धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:11+5:302021-07-02T04:16:11+5:30
लोणी-नाडी (ता. माढा) ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने मासिक सभेत बोगस ठराव दाखवून आपला शिपाई संतोष खंडागळे याचे दोन दोन बनावट सेवा ...
लोणी-नाडी (ता. माढा) ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने मासिक सभेत बोगस ठराव दाखवून आपला शिपाई संतोष खंडागळे याचे दोन दोन बनावट सेवा पुस्तके बनवित जिल्हा परिषदेच्या झालेल्या १०% ग्रामपंचायत कर्मचारी वर्गातील भरतीत सेवा ज्येष्ठता यादीनुसार आरोग्य सेवकाची नोकरी मिळवून दिली. त्यामुळे संबंधितावर तातडीने कारवाई करून जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करावे, अशी लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य धम्मपाल दणाणे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्याकडे केली होती.
तक्रारीनुसार माढ्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून व ग्रामपंचायत विस्ताराधिकाऱ्यांमार्फत सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे. चौकशीत तक्रारीनुसार तथ्य असल्याचे आढळून आल्याने संबंधित कर्मचारी हा जिल्हा परिषद शासकीय सेवेत लाभ घेण्यास पात्र आहे, असं वाटत नसल्याचा प्राथमिक अहवाल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचे भवितव्य धोक्यात आले असून, आता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात त्याचा निर्णय राहणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.