नागणसूर कन्नड शाळेतील मुलींची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:32+5:302021-07-07T04:27:32+5:30
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू ...
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तोळणूरचे डॉ. कृष्णा सुतार, डॉ. आरती शिंदे, डॉ. शैलजा मदने यांनी १४० विद्यार्थिनींंची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शांता तोळणुरे, कल्लय्या गणाचारी, जिंनेदभाषा नदाफ, शरणाप्पा फुलारी, लक्ष्मीबाई देगाव, लक्ष्मीबाई दोडमनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले, आभार नदाफ यांनी मानले.
----
फोटो : ०५ नागणूसर
नागणसूर कन्नड मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करताना डॉ. कृष्णा सुतार, आरती शिंदे, शैलजा मदने, कल्लय्या गणाचारी, जिंनेदभाषा नदाफ, शरणप्पा फुलारी, लक्ष्मीबाई देगांव, लक्ष्मीबाई दोडमनी