नागणसूर कन्नड शाळेत मुलींची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:09+5:302021-07-10T04:16:09+5:30
अक्कलकोट : नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील १४० विद्यार्थिनींची कोरोनाच्या पार्श्चभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा ...
अक्कलकोट : नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील १४० विद्यार्थिनींची कोरोनाच्या पार्श्चभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तोळणूरचे डॉ. कृष्णा सुतार, डॉ. आरती शिंदे, डॉ. शैलजा मदने यांनी १४० विद्यार्थिनींंची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शांता तोळणुरे, कल्लय्या गणाचारी, जिंनेदभाषा नदाफ, शरणाप्पा फुलारी, लक्ष्मीबाई देगाव, लक्ष्मीबाई दोडमनी आदी उपस्थित होते.
----
फोटो : ०५ नागणूसर
नागणसूर कन्नड मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करताना डॉ. कृष्णा सुतार, आरती शिंदे, शैलजा मदने, कल्लय्या गणाचारी, जिंनेदभाषा नदाफ, शरणप्पा फुलारी,