आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्रदान

By शीतलकुमार कांबळे | Published: November 7, 2022 02:20 PM2022-11-07T14:20:52+5:302022-11-07T14:21:27+5:30

सोमवार ७ नोव्हेंबर रोजी त्यांना "राष्ट्रीय फोरेन्स नाईटींगल पुरस्कार २०२१ " या  उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

Health worker Manisha Jadhav was awarded by the President | आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्रदान

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Next

सोलापूर : आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील १८ वर्षे पासून आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून आरोग्यसेवा अविरतपणे निभावत आहेत. त्यांच्या या सेवेचा सन्मान म्हणून पुरस्कार देण्यात आला.

सोमवार ७ नोव्हेंबर रोजी त्यांना "राष्ट्रीय फोरेन्स नाईटींगल पुरस्कार २०२१ " या  उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. १२ मे १८१० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्या दिन " म्हणून साजरा केला जातो. 

या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस "फ्लोरेन्स नाइटिंगेल" यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्य पुरस्कार बहाल केला जातो.
 

Web Title: Health worker Manisha Jadhav was awarded by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.