राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २८५ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:37 AM2020-02-29T11:37:20+5:302020-02-29T11:39:46+5:30
राज्यात सोलापूर प्रथम; २६१४ बालकांवर झाले यशस्वी उपचार
सोलापूर : राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांमध्ये वाढत असलेल्या हृदयआजारासंबंधी तपासणी करण्यात आली. गरजेच्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कार्यक्रमात राज्यातून सोलापूर जिल्हा प्रथम आला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.
राज्यामधील किशोरवयीन मुलांच्या हृदयाचे आरोग्य बिघडत जात आहे. सहा वर्षांच्या आतील बालकांमध्ये देखील हा आजार असल्याचे सर्वेक्षणात पाहायला मिळाले. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची दखल घेत अशा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या वर्षात राज्यात तीन हजार ४९४ बालक ांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. यातील दोन हजार ६१४ बालकांवर शस्त्रक्रि या करण्यात आल्या.
या कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात सोलापूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सोलापूरनंतर पुणे (२७०), नाशिक (२३९), अहमदनगर (१७६), नांदेड (१५५), पालघर (१३४), ठाणे (१३०), बीड (१२८), सातारा (१२०), उस्मानाबाद (११२), रत्नागिरी (१०५). प्रत्यक्षात ३४९४ बालकांवर उपचार करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात २६१४ बालक ांवर उपचार करण्यात आले. उर्वरित ८८० बालकांच्या पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली नाही. तसेच काही बालकांच्या पालक ांनी स्थलांतर केल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले नाही.
५२ टीमकडून अंगणवाडी, शाळांची तपासणी
- राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ५२ टीमने काम केले. यात एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक फार्मासिस्ट यांचा समावेश होता. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेकडून यासाठी सहकार्य करण्यात आले. या तीन जणांच्या टीमने जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली. हृदयविकार असणाºया मुलांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. शासनाने करार केलेल्या पुणे व मुंबई येथील खासगी व अद्ययावत रुग्णालयात या बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या या बालकांचे आरोग्य चांगले असल्याचे राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा पर्यवेक्षक भगवान भुसारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना काम करण्याबाबत विश्वास दिला. त्यांनी समुपदेशन करत पालकांच्या मनातील भीती काढली. तसेच खासगी रुग्णालयात येणारा खर्च व सरकारी रुग्णालयामार्फत मोफत होणारे उपचार याविषयी माहिती सांगितली. यासाठी सीईओ प्रकाश वायचळ यांचे सहकार्य लाभले.
- डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा शल्यचिकित्सक